सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता परीक्षा ( NET- SET EXAM )
नेट - सेट परीक्षा अभ्यासक्रम (पेपर १)
( मराठी भाषेतून )
अभ्यासक्रमात दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
१) हा पेपर एकूण शंभर होण्यासाठी असेल
२) एकूण 50 आवश्यक प्रश्न विचारले जातील
३) या पेपरमध्ये एकूण दहा घटक आहे
४) प्रत्येक घटकावर पाच प्रश्न विचारले जातील
५) प्रत्येक घटक हा दहा गुणासाठी असेल
घटक १ - अध्यापन अभियोग्यता :
१) अध्यापन: संकल्पना, उद्दीष्टे, अध्यापनाची पातळी (स्मरण, आकलन आणि चिंतन स्तर / प्रतिबिंबित करणे), वैशिष्ट्ये आणि मूलभूत आवश्यकता.
२) अध्ययनार्थीची वैशिष्ट्ये: पौगंडावस्थेतील आणि प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये (शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि भवात्मक), व्यक्तिभेद.
३) अध्यापनावर परिणाम करणारे घटक: शिक्षक, विद्यार्थी, अध्ययन साहित्य, भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि संस्था.
४) उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापन पद्धती: शिक्षक केंद्रित-विद्यार्थी केंद्रित पद्धती, ऑफ लाइन - ऑन-लाइन पद्धती (स्वयं, स्वयंप्रभा, mooc इ.)
५) अध्यापन सहाय्यभूत प्रणाली: पारंपारिक, आधुनिक आणि आयसीटी आधारित.
६) मूल्यमापन पद्धती : मूल्यमापनाचे प्रकार आणि तत्व, निवडीवर आधारित श्रेयांक पद्धती, संगणक आधारित चाचण्या, मूल्यमापनातील नवीन पद्धती.
घटक २ - संशोधन अभियोग्याता :
१) संशोधन : अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये, सकारात्मकता आणि उत्तर- संशोधनाकडे सकारात्मकतावादी दृष्टीकोन.
२) संशोधनाच्या पद्धती : प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन पद्धती.
३) संशोधनाच्या पायऱ्या
४) शोधाप्रबंध आणि शोधनिबंध लेखन: स्वरूप आणि संदर्भ पद्धती.
५) संशोधनात आयसीटीचा उपयोग.
६) संशोधनातील नैतिकता.
घटक 3 - परिच्छेद आकलन / उतारावरील प्रश्न
घटक 4 - संप्रेषण कौशल्य
१) संप्रेषण: अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये.
२) प्रभावी संप्रेषण: शाब्दिक, अशब्दिक, अंतरसंस्कृतिक आणि समूह संप्रेषण, वर्गातील संप्रेषण.
३) प्रभावी संप्रेषनातील अडथळे.
४) समूह संपर्क माध्यमे आणि समाज
घटक 5 - गणितीय आणि तार्किक अभियोग्यता
१) तर्काचे प्रकार.
२) संख्या मालिका, अक्षर मालिका, कोड आणि सहसंबंध
३) गणितीय अभियोग्यता (अपूर्णांक, वेळ, अंतर, प्रमाण, आणि गुणोत्तर)
४) टक्केवारी, नफा आणि तोटा, व्याज आणि सूट, सरासरी इ.)
घटक 6 तार्किक क्षमता
१) तर्काची रचना आणि आकलन : वितर्क स्वरूप, श्रेनिबद्ध प्रस्तावाची रचना, अवस्था आणि आकृती, औपचारिक आणि अनौपचारिक युक्तिदोष, भाषेचा उपयोग, शब्दाचे लक्षार्थ व व्यांगार्थ, शास्त्रीय विरोधाचा वर्ग.
२) उदगमी व अवगमी विचाराचे मूल्यमापन व वेगळेपण
२) वेन आकृती: तर्काची वैधता सुनिश्चित करण्यासाठी वेन आकृतीचा सरळ व बहुप्रयोग
३) भारतीय तर्कशास्त्र: ज्ञानाची साधने.
४) प्रमाण : प्रत्यक्ष (धारणा), अनुमान, अपमान (तुलना), शब्द (तोंडी साक्ष), अर्थापत्ती (परिणाम), आणि अनुपलब्दी (आकलन न होणे).
५) अनुमानाची रचना आणि प्रकार (अनुमान), आणि व्याप्ती , हेत्वाभास (चुकीचे अनुमान)
घटक ७ - माहितीचे विश्लेषण
१) माहितीचे स्त्रोत, संकलन आणि वर्गीकरण.
२) गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती
३) आलेखात्मक वर्णन (बार-चार्ट, स्थंभालेख, पाय-चार्ट (वर्तुळाकार), तक्ते आणि रेशालेख ) आणि माहितीचे परिमाण.
४) माहितीचे विश्लेषण
५) माहिती आणि शासन
घटक ८ - माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ICT
१) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ICT ची संक्षिप्त व्याख्या
२) मूलभूत माहिती, इंटरनेट व इंट्रानेट, ई-मेल, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मूलभूत माहिती
३) उच्च शिक्षणात माहिती तंत्रज्ञान
४) आयसीटी आणि शासन.
घटक 9 मानव, पर्यावरण आणि विकास
१) पर्यावरण आणि विकास : समृद्धीची आणि शास्वत विकासाची ध्येये
२) मानव आणि पर्यावरणाचा सहसंबंध : मानवाच्या कृतीचे पर्यावरणावर होणारे परिणाम.
३) पर्यावरणीय समस्या: स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक - वायू प्रदूषण, जल प्रदूषण, भू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, कचरा (घन, द्रव, जैववैद्यकीय, ई- कचरा) हवामान बदल आणि त्याचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिमाण.
४) प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम
५) नैसर्गिक आणि उर्जा संसाधनेः सौर, हवा, माती, जल, भू औष्णिक, जैविक घटक (बायोमास), अणुऊर्जा आणि वने.
६) नैसर्गिक धोके आणि आपत्ती: आपत्ती व्यवस्थापन
७) पर्यावरण संरक्षण कायदा (1986), वातावरण बदलाविषयीची राष्ट्रीय कृती योजना , आंतरराष्ट्रीय करार / प्रयत्न, Montreal प्रोटोकॉल, रिओ परिषद, जैवविविधतेवरील अधिवेशन, क्योटो करार, पॅरिस करार, आंतरराष्ट्रीय सौर करार.
घटक १० उच्च शिक्षण प्रणाली
१) उच्च शिक्षण संस्था आणि प्राचीन भारतीय शिक्षण
२) स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनाचा विकास.
३) भारतातील ओरिएंटल, पारंपारिक आणि अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम ,
४) व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण.
५) मूल्य शिक्षण आणि पर्यावरणीय शिक्षण.
६) विविध धोरणे, शासन आणि प्रशासन.
(टीप : इंग्रजी अभ्यासक्रम समोर ठेऊन खात्री करून घ्यावी)